Rajendra Patni

Rajendra Patni : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन

508 0

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील कारंजाचे आमदार राजेंद्र सुखानंद पाटणी (Rajendra Patni) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. मागच्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. राजेंद्र पाटणी हे भाजपचे आमदार होते. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते शिवसेनेत कार्यरत होते.

राजेंद्र पाटणी यांचा राजकीय प्रवास
1997 ते 2003 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत शिवसेनेकडून प्रतिनिधित्व केले. 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते कारंजातून विजयी झालेत. 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश डहाके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.यानंतर 2014 व 2019 मध्ये भाजपकडून ते कारंजा विधासभा निवडणुकीत विजयी झाले. 2024 मधील लोकसभा निवडणुकीआधी पाटणी यांच्या निधनामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jitendra Awhad : आमच्या पक्षानं ‘तुतारी’ हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक खुलासा

Solapur Crime : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

Share This News
error: Content is protected !!