पुणे : बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली असून, महाविकास आघाडीचा उमेदवार मात्र अजूनही ठरलेला नाही. अशात विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) पंकजा मुंडेंविरोधात लोकसभेत उतरणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यादरम्यान आता ज्योती मेटे पुण्यात शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना बीडमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ज्योती मेटे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी बीडमधील शिवसंग्राम भवन येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली पाहिजे असं एकमताने ठरविण्यात आले. त्यामुळे आता ज्योती मेटे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Cricketers : ‘या’ भारतीय क्रिकेटर्सनी निवृत्तीनंतर राजकारणात आजमावले नशीब
BCCI : आयपीएलआधी सर्फराज खान आणि ध्रुव जुरेलला लागली लॉटरी; BCCI ने दिले ‘हे’ मोठे गिफ्ट
Vasant More : मी तेव्हाच मनसे सोडणार होतो: वसंत मोरेंनी केला मोठा गौप्यस्फोट
Pune Crime News : मुलीवरून 2 मित्रांमध्ये झाला वाद; गैरसमजातून मित्राने उचलले ‘हे’ पाऊल
Kolhapur Crime News : कोल्हापूरमध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा; पोलिसांसमोरच केली दगडफेक