“आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही; धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया

423 0

नवी दिल्ली: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमका कोणाला मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती मात्र आज अखेर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. 

पक्षाचे ना बरोबरच शिवसेना हे नाव देखील कोणाला वापरता येणार नसल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केला आहे नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा निर्णय असल्याचा मानला जात आहे.

दरम्यान आता पक्षाच चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली असून सुषमा अंधारे यांनी  शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे

“आम्ही हरलो म्हणजे
तुम्ही जिंकलात असं होत नाही
डाव तुमच्या हातात असला तरी
जिंकता तुम्हाला येत नाही”
मोदी-शहा जी फडणवीसजीतुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती.
पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

 

Share This News
error: Content is protected !!