jitendra-awhad

Jitendra Awhad : ‘एका मांडीवर फुले, शाहू, आंबेडकर तर दुसऱ्या गोळवलकर..’ आव्हाडांनी पुन्हा अजितदादांना डिवचलं

716 0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर आता दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून ऐकमेकांवर घणाघाती टीका केली जात आहे. शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नागपूरमधील भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) वैचारिक बैठकीबाबतचं एक ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये “महाराष्ट्रात भाजपा एकटीच लढेल. ज्यांना भाजपाबरोबर निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी,” असं भाजपा आणि आरएसएसच्या बैठकीत ठरल्याचा दावा करत जितेंद्र आव्हाडांनी केला होता.यावर अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफांनी एकेरी उल्लेख करत आव्हाडांवर टीका केली होती.यावर आता जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
हसन मुश्रीफ यांनी एकेरी शब्द वापरले असतली तर ती त्यांची संस्कृती आहे. मुश्रीफ यांच्याशी मी माझ्या राजकीय जीवनात पाच मिनिटेही बोललेलो नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यानंतर अजित पवार यांच्या कार्यालयात बैठक झाली. यात आपण भाजपसोबत जाऊ अशी चर्चा झाली. यासाठी एक पत्र शरद पवार यांना लिहिण्यात आलं. या पत्रावर माझीही सही होती. पण, बाहेर आल्यावर जयंत पाटील यांना सांगितलं की मला हे मान्य नाही. जयंत पाटील यांनाही ते मान्य नव्हतं. ते पत्र आजही जयंत पाटील साहेबांच्या खिशात आहे. ते त्यांनी पवार साहेबांना कधीच दिलं नाही. त्यावेळी भाजप सोबत जाऊ असं म्हणणाऱ्या नेत्यांमध्ये हसन मुश्रीफ हे देखील होते.

अजित पवारांना डिवचलं
अजित पवार यांनी धर्मनिरपेक्षता हाच आमचा विचार असल्याचे बोलले होते. यावर आव्हाड यांनी म्हटलं की अजित पवार यांच्या एका मांडीवर फुले, शाहू, आंबेडकर आहेत तर दुसऱ्या मांडीवर गोळवलकर व हेगडेवार, अशी टीका आव्हाड यांनी केली. दोन विरोधी विचारसरणी, दोन समांतर मार्ग एकत्र कधी मिळत नाही. ते समांतरच जातात, असे आव्हाड म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने स्वीकारली, 24 जानेवारीला होणार सुनावणी

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ! ‘या’ ठिकाणी आढळला कोरोनाचा रुग्ण

Jammu – Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये मोठी चकमक; 4 पाकिस्तानी दहशतवाद्यांना धाडलं कंठस्थानी

Sushma Andhare : ‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही’, सुषमा अंधारेनी नीलम गोऱ्हेंना लिहिले पत्र

Coronavirus : देशात कोरोनाचा धोखा वाढला ! देशभरात 2900 हून अधिक सक्रिय रुग्ण

Suryakumar Yadav : टीम इंडियाला T -20 वर्ल्डकपपूर्वी मोठा धक्का ! सूर्यकुमारच्या दुखापतीबाबत ‘ही’ मोठी अपडेट आली समोर

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide