…तर बरं झालं असतं; नवीन संसदभवनाच्या उद्घाटनानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

529 0

नवीन संसद भवनाचे आज,२८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.भव्य सोहळा देशभरातील नेते सहभागी झाले होते. दरम्यान या नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावर देशातील २१ विरोधीपक्षांनी मात्र बहिष्कार टाकला होता

याचदरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्या संसदेच्या उद्घाटनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, आज देशाच्या नवीन संसद भवनाचं लोकार्पण झालं. संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो.

संसदेची नवी इमारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प होता, जो आज पूर्णत्वास गेला आहे. मोदींनी स्वतः या इमारतीच्या कामाचं भूमिपूजन केलं होतं आणि आज त्यांनी स्वतः या वास्तूचं उद्घाटन केलं. याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध झाला.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide