Ambadas Danve

‘ती आमची चूकच’; अंबादास दानवे यांनी दिली जाहीर कबुली

72 0

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराला अवघे सात दिवस बाकी असताना राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार प्रचार सुरू असताना आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांचं एक विधान चर्चेत आलं आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात ठाकरे गटाकडून किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्यानं ऐनवेळी पक्षाला आपला उमेदवार बदलावा लागला. यावरच अंबादास दानवे यांनी भाषा केलं आहे.

‘ती पक्षाची चूकच’

किशनचंद तनवाणी लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचारात नव्हते, संघटनेत देखील सक्रिय नव्हते, पण पक्षाने त्यांना ‘मध्य’ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.ती चूक होती, अशी कबुली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!