आपला महाराष्ट्रठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा हीच विनायक मेटेंना श्रद्धांजली; विनायक मेटेंच्या पत्नीची सरकारला विनंती

मुंबई: शिवसंग्रामचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांचं 14 ऑगस्ट रोजी पहाटे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण आपघात झाला असून या अपघातात त्यांची प्राणज्योत मालवली.

मेटेंच्या अपघाती निधन झाल्यानंतर सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात आल्यानंतर आता विनायक मेटे यांच्या पत्नी जोस्ना मेटे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा हीच विनायक मेटेंना श्रद्धांजली असेल असं मत व्यक्त केलं आहे.

दरम्यान आता मराठा आरक्षणावर राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल