ठरलं! अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून ‘हा’ नेता घेणार केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

648 0

देशात एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 9 जून रोजी सायंकाळी सहा वाजता तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा आणि मित्र पक्षांचे मिळून 18 खासदार मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. एनडीए मध्ये चार खासदारांमागे एक मंत्रीपद मंत्रीपद असा फॉर्म्युला निश्चित झाला असून महाराष्ट्रातून अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर मंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब झालं आहे.

प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधील वजनदार नाव असून एकेकाळी शरद पवारांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती मात्र अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रफुल पटेल देखील अजित पवारांसोबत सहभागी झाले. अनेक वर्ष दिल्लीतील कामाचा असलेला अनुभव आणि केंद्रीय मंत्रिपदावर केलेलं काम या प्रफुल पटेल यांच्या जमेच्या बाजू असून यामुळेच प्रफुल पटेल यांना मंत्रिपदावर संधी मिळाल्याचं बोललं जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!