आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा चांगलेच ऍक्टिव्ह झाल्याचे पाहायला मिळत असून माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या खांद्यावर भाजपानं मोठी जबाबदारी सोपवली आहे…
भाजपाच्या मुख्यालयात पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये भाजपाच्या निवडणूक संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रावसाहेब पाटील दानवे यांना संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असून 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पद ही सांभाळलं आहे… जालना लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजयी झालेले रावसाहेब पाटील दानवे यांची 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लागली होती.
मात्र अवघ्या नऊ महिन्यातच त्यांच्याकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा रावसाहेब पाटील दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे, खणीकर्म खात्याच्या राज्यमंत्रीपदी वर्णी लागली…. मात्र 2024 मध्ये काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी रावसाहेब पाटील दानवे यांचा लोकसभेला तब्बल एक लाख मतांनी पराभव केला