पंजाब मध्ये आप आघाडीवर तर गोव्यात सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूनं

284 0

नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागणार असून या निकालाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

आतापर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीच्या आकडेवारीनुसार पंजाब मध्ये आप आघाडीवर तर गोव्यात सुरुवातीचे कल भाजपाच्या बाजूनं असल्याचं सांगितलं जातं आहे.

आज दुपारपर्यंत सर्वच राज्यातील निकालांचा कल स्पष्ट होईल. त्यामुळे कोणता पक्ष कोणत्या राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

पंजाबमध्ये गेले काही महिने मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, नंतर चरणजित सिंग चन्नी मुख्यमंत्री झाले आणि अमरिंदर सिंग यांनी वेगळा पक्ष काढत भाजपासोबत हातमिळवणी केली. तर, आम आदमी पक्षाने पंजाबमधील निडवणूक चुरशीची केली होती. त्यामुळे आपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, गोवा, उत्तराखंड व मणिपूर या तीनही राज्यांमध्ये काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्यासाठी चढाओढ असेल.

Share This News

Related Post

आदित्य ठाकरेंच्या ‘या’ विश्वासू शिलेदाराचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’

Posted by - June 30, 2023 0
शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांचे शिवसेनेत आऊटगोइंग सुरूच असून त्यात दिवसेंदिवस अधिकाधिक भर पडत आहे. त्यातच ठाकरेंचा अत्यंत विश्वासू सहकारी उद्या…

TOP NEWS MARATHI : पुण्यात सकाळपासून सुरू झालेला रिक्षाचालकांचा चक्काजाम अजूनही सुरूच

Posted by - December 12, 2022 0
पुणे : रिक्षावाला गाळतोय आपला घाम चक्काजाम चक्काजाम अशा आक्रोश आज सकाळपासूनच पुण्यात ऐकू येतोय. २० नोव्हेंबर पासून रिक्षा संघटनांचे…
Shrinath Bhimale

Shrinath Bhimale : पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती

Posted by - September 14, 2023 0
पुणे : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या ‘महाविजय 24’ या अभियानाच्या पुणे लोकसभा समन्वयकपदी महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले…

Breaking News ! ‘सिल्वर ओक’ आंदोलन प्रकरणी अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांच्या कोठडीत १३ एप्रिलपर्यंत वाढ

Posted by - April 11, 2022 0
मुंबई- शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानावर झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलन प्रकरणी अटकेत असलेले अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *