गुजरातमध्ये ‘आप’चा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला; पाहा कोण असेल ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

227 0

गुजरात: आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये आपला मुख्यमंत्री चेहरा जाहीर केला आहे. केजरीवाल यांनी इसुदान गढवी यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे.

या घोषणेनंतर आपच्या गुजरातमधील प्रचाराला आता आणखी जोर येणार आहे. केजरीवाल यांनी लोकांना एसएमएस, व्हॉट्सअप, व्हॉइस मेल आणि ई-मेलद्वारे पक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. राज्यात पक्षाचा मुख्यमंत्री उमेदवार कोण असावा हे त्यांना कळवा असे आवाहन त्यातून करण्यात आले होते. त्यांनी लोकांना 3 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे मत देण्यास सांगितले होते. ज्याच्या आधारावर पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार 4 नोव्हेंबरला जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. आज त्यांनी उमेदवार जाहीर केला.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide