छत्रपती संभाजीनगर : सध्या सगळीकडे लोकसभेचे वारे वाहू लागले आहे. छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. ‘एमएआयएम’कडून छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांना पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ‘एमएआयएम’चे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी ही उमेदवारी जाहीर केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या जागेवरुन उमेदवारी देणार आहे. अद्याप ठाकरे आणि शिंदेंचा उमेदवार ठरलेले नाही. मात्र, महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला जाणार आहे. तर महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलील यांच्या विरोधात इतर दोन उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोण आहेत इम्तियाज जलील?
इम्तियाज जलील हे लोकमत आणि एनडीटीव्हीचे पत्रकार होते. त्याने 2014 मध्ये राजकारणात प्रवेश करत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (MIM) करीता औरंगाबाद मधून विधानसभा मतरसंघातून निवडणूक लढवली. सध्या ते 13 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असून औरंगाबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. जलील हे वंचित बहुजन आघाडी-एआयएमआयएम युतीचे उमेदवार म्हणून एआयएमआयएम पक्षाच्या तिकिटावर 17 व्या लोकसभेसाठी औरंगाबाद मतदारसंघातून जिंकले आहेत. त्यांनी चार वेळा औरंगाबादचे खासदार राहीहेल्या चंद्रकांत खैरेंचा पराभव केला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! इंदापूर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 24 तासांत अटक
Lok Sabha Election 2024 : अखेर ! लोकसभेसाठी ठाकरे गटाचे 16 शिलेदार ठरले
Weather Update : विदर्भाला अवकाळी पावसासह गारपिटीनं झोडपलं; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
Chhatrapati Sambhajinagar Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! शेतीच्या वादातून भावाने काढला भावाचाच काटा
Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का ! सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनीदेखील सोडली साथ
Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू
Railway Accident : साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात