hsc exam board hall ticket distribuation

BOARD EXAM: 12वीच्या परीक्षेपूर्वी मोठी सूचना; हॉल तिकिट वाटप सुरू

96 0

बारावीच्या परीक्षेची (12th BOARD EXAM) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीच्या(MAHARASHTRA STATE BOARD HSC & SSC EDUCATION)लेखी परीक्षांबाबत अधिकृत सूचना जारी केली असून, 10 फेब्रुवारी 2026 पासून बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. या परीक्षा 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहेत.

दरम्यान, बारावीच्या हॉल तिकिटांचे (HALL TIवाटप सुरू झाले आहे. हॉल तिकिटे ऑनलाईन उपलब्ध असली तरी महाविद्यालयांनी ती प्रिंट करून विद्यार्थ्यांना मोफत द्यायची आहेत. विद्यार्थ्यांनी हॉल तिकिटावर मुख्याध्यापकांची सही व शिक्का घेणे बंधनकारक आहे. सही नसल्यास परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला जाऊ शकतो.

कॉपीमुक्त परीक्षांसाठी बोर्डाने कडक पावले उचलत दहावीची 31 व बारावीची 76 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द केली असून, भरारी पथक व सीसीटीव्हीद्वारे कडक देखरेख ठेवली जाणार आहे. दहावीच्या परीक्षांची हॉल तिकिटेही लवकरच उपलब्ध होणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!