१५ दिवसात अनधिकृत बांधकाम पाडा अन्यथा…. ; मुंबई महापालिकेचा राणा दांपत्याला अल्टिमेटम

344 0

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरातील अनधिकृत बांधकाम पाडा अन्यथा पालिका कारवाई करेल अशी नोटीस बजावली आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी राणा दांपत्याला ७ ते १५ दिवसांची मुदत दिली आहे. महापालिकेच्या या नोटीशीनंतर राणा दांपत्य काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

खार येथील राणा दाम्पत्याच्या इमारतीचा अधिकृत आराखडा मंजूर करण्यात आला होता. त्या व्यतिरिक्त बांधकाम का केलं ? असा प्रश्न नोटिशीतून पालिकेतील अधिकाऱ्यांनी विचारला आहे. पालिकेने दिलेल्या नोटिशीनंतर राणा दांपत्याला नियमिततेसाठी अर्ज करता येऊ शकतो. पण सध्या महाराष्ट्रातील राजकारण अधिक तापले असल्याने राणा दांपत्याच्या या अर्जावर पालिका किती विचार करू शकेल हा प्रश्न आहे. त्यामुळे राणा दाम्पत्य न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे

दरम्यान, ठाकरे सरकारने ही सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप राणा दांपत्याने केला आहे. खारमध्ये आमचे एकच घर आहे, सेनेतल्या नेत्यांसारखी आमची अनेक घरे नाहीत. ते आमचे घर पडू शकतात. यापूर्वी देखील त्यांनी अनेकांची मुंबईत घरे पाडली आहेत. असे राणा दांपत्याने म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!