मला पक्षादेश पाळायचाय; आजारी असतानाही लक्ष्मण जगताप मुंबईत जाऊन करणार राज्यसभेसाठी मतदान

539 0

राज्यसभा निवडणुकीसाठी  मतदान आता काही तासांवर येऊन ठेपले आहे. एका एका आमदाराचे मतदान प्रत्येक पक्षाला अत्यंत गरजेचं झालं आहे.

त्यासाठी आपली मते वाढवण्यासाठी सर्वच पक्ष कसून तयारी करत आहेत. त्यात भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आजारी असतानाही मुंबईला जाण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर पक्षाने त्यांना मुंबईला नेण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप हे सध्या आजारी आहेत. ते सध्या बेडरेस्टवर असतानाही मतदानासाठी जायला तयार झाले असून पक्षांनी त्यांना आणण्यासाठी एअरअॅम्बुलन्सची सोय केली आहे. त्यांच्या कुंटुंबियांचे त्यांना अशा परिस्थिती घराबाहेर काढण्याचे धाडस होत नसतानाही ते “हा पक्षाचा आदेश आहे आणि तो मला पाळायचा आहे” असा हट्ट धरून मुंबईला जाण्यासाठी तयार झाले आहेत. त्यामुळे लक्ष्मण जगताप हे राज्यसभेच्या मतदानासाठी हजर असणार आहेत.

त्यांच्या प्रवासासाठी पक्षाने चक्क एअर अॅब्युलन्सचीही सोय केलीय. एवढेच नाही या अॅम्बुलन्समध्ये खास उपचार व्यवस्थेची सोय आहे. पण या अवस्थेत जगताप यांना घराबाहेर काढायला कुटुंबियांचं धाडस होईना. पण पक्षाचा आदेश आहे आणि तो मला पाळायचायं, असा हट्ट करुन स्वतः लक्ष्मण  मुंबईत मतदानासाठी जायचं यावर ठाम आहेत आणि लक्ष्मण जगताप यांचा हा हट्ट पुरवायचा निर्णय कुटुंबियांनी घेतलायं. त्यामुळे जगताप उद्या मतदानासाठी मुंबईत मतदानासाठी दाखल होणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!