‘मी अजित पवार, मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की..’; अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी बनवला खास केक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा रेकॉर्ड आहे. मात्र अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची इच्छा अजूनही पूर्ण झालेली नाही. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना देखील त्यांना मुख्यमंत्री झालेले पाहायचे आहे. मात्र अनेकदा संधी येऊ नये मुख्यमंत्रीपदाने अजित पवारांना हुलकावणी दिली. मात्र यंदाच्या विधानसभेनंतर अजित पवारच मुख्यमंत्री होतील ही इच्छा मनात बाळगून अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी एक भन्नाट केक बनवून आणला. ज्या केकचे सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. यांना अनेकदा मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली.
अजित पवार यांचा उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी वाढदिवस असतो. राज्यभरातील कार्यकर्ते अजित पवारांचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स देखील अनेक वेळा लागतात. मात्र पिंपरी चिंचवड शहरातील कार्यकर्त्यांनी अजित पवारांसाठी एक खास केक बनवला. या केकवर ‘मी अजित आशा अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की …’ अशा आशयाचा मजकूर देखील लिहिण्यात आला होता. हा केक बघताच अजित पवारांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. हा केक आपल्या दादांनी कापावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेचा मान राखत अजित पवारांनी हा केक कापून एक दिवस आधीच आपला वाढदिवस साजरा केला. सध्या केकचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर यंदा अजित पवार मुख्यमंत्री होणारच असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.