मी भगवंत मान….शपथ घेतो की ; भगवंत मान यांनी घेतली पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ

400 0

आम आदमी पार्टीचे भगवंत मान यांनी आज पंजाबच्या  25 व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भगतसिंग यांचे पंजाबमधील वडिलोपार्जित गाव खटकर कलान येथे हा शपथविधी पार पडला.

यावेळी आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  यांच्यासह पक्षातील आणि कुटुंबातील काही मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्यासाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.

विशेष म्हणजे, कोणत्याही केंद्रीय मंत्री किंवा राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही मोठ्या नेत्याला शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. या शपथविधी सोहळ्याची खास बाब म्हणजे ज्या लोकांना या शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आले होते.

त्यात पुरुषांना पिवळ्या रंगाची पगडी आणि महिलांसाठी पिंवळ्या रंगाच्या ओढण्या परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. भगतसिंग यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पिवळ्या रंगाला प्राधान्य देण्यात आले होते.

Share This News
error: Content is protected !!