पुणे: भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाले असून या पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने उद्या म्हणजे सोमवारी सकाळी 11:30 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ आदी नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी कसबा गणपती मंदिर ते श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरपर्यंत भाजपा पदयात्रा काढणार आहे. यानिमित्तानं भाजपा जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे.