देख लेंगे राज ठाकरे में कितना है दम - गुणरत्न सदावर्ते

देख लेंगे राज ठाकरे में कितना है दम – गुणरत्न सदावर्ते

3950 0

मुंबई : मुलांना ज्ञान मिळवण्याची संधी मिळत असेल तर तुम्ही त्याला विरोध का करताय? असे विचारत नेत्यांची मुले इंग्रजी शाळेत शिकतात तर सर्वसामान्यांच्या मुलांनी स्थानिक शाळेतच शिकायचे का? असा उलट सवाल वकील गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केला आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात काही दम असणार नाही, आम्ही त्यांना बघून घेऊ, असा इशाराच सदावर्ते यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात हिंदी सक्तीचा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

सदावर्ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्या मनसेसारखे अनेक नोंदणीकृत पक्ष गल्लीबोळात दिसून येतात. याचा अर्थ या पक्षांनी मुलांच्या प्रगतीत अडथळा आणणे योग्य नाही. आम्ही संविधानाने त्यांचा विरोध करणार असून न्यायालयात दाद मागणार आहोत. राज ठाकरे यांनी मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला असला तरीही तो चालणार नाही. या आंदोलनातून ते माघार घेतील, असा चिमटा सदावर्ते यांनी काढला आहे.

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024′ नुसार, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य केली जाणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. मात्र, या निर्णयाला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह मनसेने कडाडून विरोध सुरू केला आहे. निर्माता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांचा पॉडकास्ट बनवला आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांनी हिंदीच्या सक्तीविरोधात आपली प्रखर भूमिका मांडली आहे. महेश मांजरेकर यांनी त्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Share This News
error: Content is protected !!