गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ‘ठाकरी तोफ’

501 0

जळगाव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रविवार (23 एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे सभा पार पडत आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या यांच्या बालेकिल्ल्यात ही सभा होत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लागलं आहे.

पाचोऱ्यातील सावा मैदानावर सायं. 5 वाजता सभा होत आहे. सभेला संजय राऊत यांच्यासह विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे उपस्थित राहणार आहेत.

या सभेच्या पार्श्वभुमीवर ठाकरे गटाकडुन जय्यत तयारी करण्यात आली आहे.  मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी सभा उधळून लावण्याचा इशारा दिल्याची माहिती समोर आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!