गोपीचंद पडळकरांनी लिहलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

284 0

मुंबई: महाराष्ट्र सरकारने काढलेल्या जीआरमूळे पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पण आगामी पोलीस भरतीत घातलेल्या नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेट सादर करण्यासंदर्भाततील अटीमुळे विद्यार्थ्यांचे नूकसान होण्याची शक्यता आहे, अशा संदर्भाचे पत्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.

*नेमकं काय म्हटलं आहे पत्रात*

महाराष्ट्रात परत एकदा बहुजन हिताचा विचार व व्यवहार करणारे युती सरकार आल्यामुळे राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. अनेक धडाडीचे निर्णय घेतले जात आहेत. महाराष्ट्रातील तरूणांचा विचार करता आपल्या मार्गदर्शनाखाली गृह विभागामार्फत मेगा पोलिस भरती होत आहे. त्याचे स्वागत सर्वच स्तरातून झाले.

सदरील पोलीस भरती प्रक्रीयेत इतर मागास, भटक्या विमुक्त जमाती, जाती व विशेष मागास प्रवर्गातील उत्तीर्ण उमेदवारांना दि. १ एप्रील २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वित्तीय वर्षातील नॉन क्रिमिलेअर सर्टीफिकेट सादर करण्याची अट आहे. या अटीतील तारखेमुळे विद्यार्थ्यांमधे एक संभ्रम निर्माण झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या विशिष्ट तारखेतीलच सर्टीफिकेट सादर करणे हे उमेदवारांना अशक्य आहे. यामुळे हजारो बहुजन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आपल्यासारख्या संवेदनशील व्यक्तीने या बाबीकडे लक्ष देऊन तारखेच्या अटीची शिथिलता करावी व बहुजन विद्यार्थ्यांना आश्वस्थ करावे, ही विनंती.

Share This News
error: Content is protected !!