गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा दाखल; वाचा काय आहे प्रकरण?

402 0

गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे  पुन्हा एकदा नव्या वादाने चर्चेत आले आहेत. गुट्टे यांच्यावर आता गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

कारण शेतीच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप गुट्टे यांच्यावर लावण्यात आला आहे. गंगाखेड तालुक्यातील बनपिंपळा येथील महिलेने गंगाखेड पोलिसांत गुट्टे यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.

या संदर्भात महिलेच्या तक्रारी वरून गंगाखेड पोलिसात आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे सहित इतर ३५ जणांविरिद्ध मारहाण तसेच विनयभंगाचा गुन्हा करण्यात आला आहे. ३५४ (ब) ३२४, १८४, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ आणि १३५ बी.पी.अॕक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना डॉ.गुट्टे यांनी महिलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे, जी शेत जमीन अस्तित्वातच नाही आणि अशी काही घटना घडलीच नाही, जो काही प्रकार झाला आहे त्याचे सर्व व्हिडीओ त्यांनी स्वतः पोलीसांना दिले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!