उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांचं निधन

365 0

उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि  माजी केंद्रीय संरक्षण मंत्री समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंग यादव यांचं निधन झालं असून सकाळी 8:15 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांच्यावर उपचार सुरू होते. मुलायम सिंह यांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होता. त्यातच ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डमध्ये हलवण्यात आले होते. आयसीयूमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

मुलायम सिंह यांनी ते 1989 ते 1991, 1993 ते 1995 आणि 2003 ते 2007 या तीन अल्प कालावधीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे ते वडील आहेत. ते सध्या आझमगड मतदारसंघाचे खासदार आहेत. 1996-1998 पर्यंत त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री म्हणून काम केले.

1974-2007 दरम्यान सात वेळा ते उत्तर प्रदेशचे आमदार म्हणून निवडून आले. मुलायम सिंह यांनी 1992 मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या समाजवादी पक्षाचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेईपर्यंत त्यांनी विविध राजकीय पक्षांशी युती केली. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने अनेक वेळा विजय मिळवला. सध्या ते लोकसभा खासदार होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!