विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष हे जोरदार तयारीला लागले असून आता, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दोन महिने शिल्लक असून, महायुती आणि महाविकास आघाडी कडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षांकडून आपल्या पक्षाला कशा जास्तीत जास्त जागा मिळतील. यासाठी पक्षांमध्ये रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतयं. महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्यापही विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत परंतु मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी वर्सोव्यातून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे चर्चेत आले होते. मुंबईतील वर्सोवा येथील झुलेलाल मंदिरात पूजा करत प्रचाराची सुरुवात केली.आपल्या उमेदवारीबाबत घोषणा करताना संजय पांडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, “आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचारची सुरुवात केली . कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू…”असं संजय पांडे म्हणालेत
*Mid Anchor*
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पण निवडणूक लढावी ही जनतेची इच्छा असल्याचा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी म्हटलं असून विधानसभा मतदारसंघाची घोषणा ही त्यांनी केली आहे
संजय पांडे यांच्या कंपनीनं जवळपास आठ वर्ष नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करून हे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीनं केला होता.
याचप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर संजय पांडे ज्यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक होते, तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला असल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
वर्सोव्यातून संजय पांडे यांनी त्यांची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्याने त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोण उमेदवार असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.