मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना जामीन; आठ वर्षांनंतर येणार तुरुंगा बाहेर

1293 0

बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. पांढरे यांनी हा जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने मंगळवारी (ता. ६ जून) जामीन मंजूर होता त्यानंतर ते आज तुरुंगाबाहेर येणार आहेत. दरम्यानयामुळं कदम यांना आठ वर्षानंतर दिलासा मिळाला आहे.

अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाची फसवणूक आणि सोलापूर, मुंबईत अनेक घोटाळे केल्याचा आरोप रमेश कदम यांच्यावर आहे दरम्यान आता त्यांना जामीन मंजूर झाल्यानं तुरुंगा बाहेर येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला असून हा ठाण्यातील मध्यवर्ती तुरुंगा बाहेर रमेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी जमण्यास सुरुवात केली आहे

Share This News
error: Content is protected !!