Meenakshi Patil

Meenakshi Patil : माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचं निधन

329 0

रायगड : माजी मंत्री आणि शेकापच्या नेत्या मीनाक्षी पाटील (Meenakshi Patil) यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 76 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या अनेक वर्षांपासून नेरूळ येथे वास्तव्याला होत्या. मागच्या अनेक वर्षांपासून त्या आजारी होत्या. काल त्यांची अचानक प्रकृती खालवल्यानं त्यांना जेएसडब्लू वडखळ येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

शेकाप नेते जयंत पाटील यांच्या त्या बहीण आहेत. कुशल वकृत्व आणि नेतृत्वासाठी त्यांना ओळखलं जातं. अलिबाग पेझारी येथील स्मशान भूमीत आज दुपारी दोन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मीनाक्षी पाटील यांची राजकीय कारकीर्द
मीनाक्षी पाटील या 1995 ते 1999, 1999 ते 2009, 2009 ते 2014 अशा सगल तीन वेळा आमदार होत्या. त्यांनी 1999 मध्ये काहीकाळ विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gold Rate : सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ; गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत

Share This News
error: Content is protected !!