अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; सुनील टिंगरे यांचा पत्ता कट

143 0

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. नुकतीच भाजपाकडून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 38 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या उमेदवारांची घोषणा केली आहे या पहिल्या यादीतून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा पत्ता कट झालाय.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती मतदारसंघातूनच निवडणूक लढणार असून दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ, परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे, तर दिंडोरी मतदार संघातून नरहरी झिरवाळ यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे तर हडपसर विधानसभा मतदारसंघातून चेतन तुपे यांनाही दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!