Sanjay Raut

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

630 0

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या समोरील अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. संजय राऊत यांच्या विरोधात अहमदनगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगजेब आणि नरेंद्र मोदी यांचा जन्म एकाच गावात झाला असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. त्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?
नगर-दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी 8 मे रोजी अहमदनगर मध्ये जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. दोन गुजराती लोकांना महाराष्ट्राबद्दल राग आहे. ते सुडाचं राजकारण करत आहेत असं राऊत म्हणाले होते.

राऊत म्हणाले होते की, आपल्याला इतिहासामध्ये जावे लागेल. औरंगजेबाचा जन्म गुजरात मध्ये झाला होता तेथील माती औरंगजेबाची माती आहे. त्या मातीतील हे दोन व्यापारी आहेत. औरंगजेबाचा जन्म आणि नरेंद्र मोदी यांचा जन्म दावत मध्ये झाला आहे. औरंगजेब तिथे जन्माला आला आहे. त्यामुळे आपल्याशी औरंगजेब्याच्या वृत्तीने हे दोन व्यापारी वागत आहेत. एका औरंगजेबाला महाराष्ट्र मध्ये आम्ही गाडला आहे. तर तू कोण असा एकेरी उल्लेख संजय राऊत यांनी यावेळी केला.

या प्रकरणी अंमलदार अतुल काजळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात खासदार संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!