बहुचर्चित असा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा खाते वाटप आज अखेर जाहीर झाला असून गृहखात हे भाजपकडेच राहणार आहे. नगरविकास खाते शिवसेनेकडे तर अर्थखातं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच राहणार आहे
सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 42 मंत्री असून यामध्ये भाजपाचे 20 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृहनिर्माण तर अजित पवारांकडे अर्थ खात्याबरोबरच राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील देण्यात आला आहे.
कोणत्या मंत्र्यांना मिळालं कोणतं खातं?
कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6.गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7.गणेश नाईक – वन
8.दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9.संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10.धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार
12.उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14.पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15.अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
16.अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19.दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे – महिला व बालविकास
21.शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22.माणिकराव कोकाटे – कृषी
23.जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे – कापड
26.संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27.प्रताप सरनाईक – वाहतूक
28.भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29.मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31.आकाश फुंडकर – कामगार
32.बाबासाहेब पाटील – सहकार
33.प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री (State Ministers )
34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम – गृहराज्य शहर
39. पंकज भोयर – गृहनिर्माण,
Maharashtra Politics : राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या नांदेडला यंदा मंत्रीपदाचा भोपळा
Pingback: Strong Investor Response on Final Day of DAM Capital Advisors IPO Subscription - Top News English