दिल्लीतील कथित मध्य घोटाळा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर रविवारी अरविंद केजरीवाल्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या कार्यकर्ता मेळाव्यात अरविंद केजरीवालांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.
पुढील दोन दिवसात आपण दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा देत असून महाराष्ट्राबरोबरच दिल्लीच्या विधानसभा निवडणुका घ्याव्यात अशी मागणी ही अरविंद केजरीवाल यांनी केली.
अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार अशा चर्चा सुरू होत्या. अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी आणि आम आदमी पक्षाच्या समन्वयक सुनिता केजरीवाल, राज्यसभा खासदार, राघव चड्डा, संजय सिंग, सौरभ भारद्वाज आदिषी मार्लेना इत्यादी नावं दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होती.
आज अखेर झालेल्या बैठकीत आदिशी मार्लेना यांच्या गळ्यामध्ये यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली असून सध्या अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून आदीशी कार्यरत होत्या.