ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

अखेर…जिल्हानिहाय पालकमंत्री जाहीर; कोणत्या मंत्र्याला मिळाला कोणता जिल्हा ?

मुंबई: राज्यातील अभूतपूर्व सत्ता नाट्यानंतर अखेर 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर तब्बल 39 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.

या मध्ये 18 मंत्र्यांनी शपथ घेतली मात्र अजूनही पालकमंत्री न मिळाल्याने विरोधकांकडून टिकेची जोड उठवण्यात येत होते यावर अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा निहाय्य पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, वर्धा,अमरावती,अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील तर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याची तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

पाहा कोणत्या मंत्र्याला मिळाला कोणता जिल्हा 

  • राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, 
  • सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, 
  • चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
  • विजयकुमार गावित- नंदुरबार,
  • गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, 
  • गुलाबराव पाटील – बुलढाणा, जळगाव
  • दादा भुसे- नाशिक, 
  • संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
  • सुरेश खाडे- सांगली,
  • संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
  • उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,
  • तानाजी सावंत-परभणी,उस्मानाबाद (धाराशिव)
  • रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
  • अब्दुल सत्तार- हिंगोली, 
  • दीपक केसरकर -मुंबई शहर , कोल्हापूर, 
  • अतुल सावे – जालना, बीड,
  • शंभूराज देसाई – सातारा, ठाणे,
  • मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर