अखेर तीन महिन्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मिळाला; ‘या’ माजी नगरसेवकांची शहराध्यक्षपदी वर्णी

166 0

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. अशातच आता अखेर तीन महिन्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मिळाला आहे.

अजित गव्हाणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते मात्र त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने ही जागा तीन महिन्यांपासून रिक्त झाली होती.

आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक योगेश बहल यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली.

योगेश बहल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. असं म्हणत अजित पवारांनी योगेश बहल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!