वडील शिंदे गटात मुलगा मात्र ठाकरेंसोबत; संजय राऊतांच्या भेटीनंतर अमोल किर्तिकर म्हणाले

279 0

खासदार गजानन कीर्तिकर यांनी शुक्रवारी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षात प्रवेश केला. मात्र, गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेले असले तरी, अद्याप त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर उद्धव ठाकरेंसोबतच आहे.

गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांनी आज शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली

गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश करताच ठाकरे गटाने त्यांची नेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंबाबत भाष्य केले आहे. त्या शिवसेनेबद्दल मला कुठलाही राग नाही. तसेच उद्धव ठाकरेंबद्दल कुठलही अवमानकारक विचार नाहीत, असे गजानन किर्तीकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गजानन किर्तीकर हे शिंदे गटात गेल्यानंतरही अमोल कीर्तिकर  यांनी मात्र उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे म्हटले आहे. मी वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा निर्णय वैयक्तिक असल्याचं अमोल किर्तीकर यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली होती. त्यानंतर आता गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. गजानन किर्तीकर यांनीही मुलाच्या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!