राजकारण

Exit Poll Lok Sabha Election : लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आज सातव्या टप्प्यातील (Exit Poll Lok Sabha Election) मतदान पार पडले. सातव्या टप्प्यात देशातील 7 राज्यं आणि एका केंद्राशासित प्रदेशातील 57 जागांवर आज मतदान पार पडले. 4 जूनला मतमोजणी होणार असून, यानंतर देशात सलग तिसऱ्यांदा भाजपाचं सरकार येणार की काँग्रेस बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे. तसेच महाराष्ट्रातील 48 जागांवर नेमका काय निकाल काय असेल? शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर होणारी ही पहिली मोठी निवडणूक असल्याने महाराष्ट्राची जनता काय कौल देते हे पाहणेदेखील महत्वाचे असणार आहे. चला तर मग सध्या जाणून घेऊया लोकसभा एक्झिट पोलचे निकाल ?

लोकसभा निवडणूकीचा एक्झिट पोल
एक्झिट पोलनुसार बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर आहेत तर बजरंग सोनावणे पिछाडीवर आहेत.

नगरमध्ये सुजय विखे पिछाडीवर तर निलेश आघाडीवर आहेत.

कोल्हापूरमधून शाहू महाराज आघाडीवर आहेत तर संजय मंडलिक पिछाडीवर आहेत.

चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर आघाडीवर तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत.

सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आघाडीवर तर ठाकरे गटाचे विनायक राऊत पिछाडीवर आहेत.

उत्तर मध्यमुंबईतून वर्षा गायकवाड आघाडीवर आहेत तर भाजपचे उज्ज्वल निकाल पिछाडीवर आहेत.

अमरावतीमधून नवनीत राणा आघाडीवर आहेत तर बळवंत वानखेडे पिछाडीवर आहेत.

संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे आघाडीवर तर संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील पिछाडीवर आहेत.

नाशिकमधून राजाभाऊ वाजे आघाडीवर आहेत तर हेमंत गोडसे आणि शांतिगिरी महाराज पिछाडीवर आहेत.

रायगडमधून अंनत गीते आघाडीवर आहेत तर सुनील तटकरे पिछाडीवर आहेत.

धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर आघाडीवर आहेत तर अर्चना पाटील पिछाडीवर आहेत.

सांगलीमधून अपक्ष विशाल पाटील आघाडीवर आहेत तर भाजपचे संजय पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.

नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर आघाडीवर आहेत तर वसंतराव चव्हाण पिछाडीवर आहेत.

ठाण्यामधून राजन विचारे आघाडीवर आहेत तर शिंदे गटाचे नरेश म्हस्के पिछाडीवर आहेत

परभणीमधून संजय जाधव आघाडीवर आहेत तर महादेव जानकर पिछाडीवर आहेत.

साताऱ्यातून शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत तर उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत.

सोलापूरमधून प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत तर राम सातपुते पिछाडीवर आहेत

माढामधून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत तर रणजित निंबाळकर पिछाडीवर आहेत

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत तर वैशाली दरेकर पिछाडीवर आहेत.

जालन्यामधून रावसाहेब दानवे आघाडीवर तर मंगेश साबळे आणि कल्याण काळे पिछाडीवर

दिंडोरीमधून भास्कर भगरे आघाडीवर तर भारती पवार पिछाडीवर आहेत.

उत्तरमुंबई मधून पियुष गोयल आघाडीवर तर भूषण पाटील पिछाडीवर

धुळ्यातून सुभाष भामरे आघाडीवर तर काँग्रेसच्या शोभा बच्छाव पिछाडीवर

नंदुरबारमधून हिना गावित आघाडीवर तर गोवाल पाडवी पिछाडीवर आहेत.

जळगावमधून स्मिता वाघ आघाडीवर तर करण पवार पिछाडीवर आहेत.

पुण्यामधून मुरलीधर मोहोळ आघाडीवर तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर पिछाडीवर तसेच वंचितचे वसंत मोरे पिछाडीवर

उत्तर पश्चिम मुंबईमधून अमोल कीर्तिकर आघाडीवर तर रवींद्र वायकर पिछाडीवर

यवतमाळमधून संजय देशमुख आघाडीवर तर राजश्री पाटील पिछाडीवर

शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे आघाडीवर तर सदाशिव लोखंडे पिछाडीवर

बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर आघाडीवर तर प्रतापराव जाधव पिछाडीवर

ईशान्य मुंबईमधून संजय दीना पाटील आघाडीवर तर मिहीर कोटेचा पिछाडीवर

भिवंडीमधून कपिल पाटील आघाडीवर तर बाळ्यामामा म्हात्रे पिछाडीवर

मावळमधून श्रीरंग बारणे आघाडीवर तर संजोग वाघेरे पिछाडीवर

अकोल्यातून अनुप धोत्रे आघाडीवर तर प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील पिछाडीवर

शिरूरमधून अमोल कोल्हे आघाडीवर तर शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर

वर्ध्यातून रामदास तडस आघाडीवर तर अमर काळे पिछाडीवर

रावेरमधून रक्षा खडसे आघाडीवर तर श्रीराम पाटील पिछाडीवर

भंडाऱ्यातून सुनील मेंढे आघाडीवर तर प्रशांत पडोळे पिछाडीवर

मुंबई दक्षिण मध्य मधून राहुल शेवाळे आघाडीवर तर अनिल देसाई पिछाडीवर

रामटेकमधून राजू पारवे आघाडीवर तर श्यामकुमार बर्वे पिछाडीवर

हिंगोलीमधून नागेश आष्टीकर आघाडीवर तर बाबुराव कोहळीकर पिछाडीवर

हातकणंगलेमधून सत्यजित आबा पाटील आघाडीवर तर धैर्यशील माने आणि राजू शेट्टी पिछाडीवर

लातूरमधून शिवाजीराव काळगे आघाडीवर तर सुधाकर शृंगारे पिछाडीवर

दक्षिणमुंबईमधून अरविंद सावंत आघाडीवर तर यामिनी जाधव पिछाडीवर

पालघरमधून हेमंत सावरा आघाडीवर तर भारती कामडी पिछाडीवर

बारामतीमधून सुप्रिया सुळे आघाडीवर तर सुनेत्रा पवार पिछाडीवर

नागपूरमधून नितीन गडकरी आघाडीवर तर विकास ठाकरे पिछाडीवर

देश
एनडीए – 353 – 368
इंडिया – 118-133
इतर 43-48

महाराष्ट्र
महायुती – 22
महाविकास आघाडी – 25
अपक्ष – 1

झी न्यूज च्या सर्वेनुसार इंडिया आघाडीला 118 ते 113 जागा मिळण्याची शक्यता तर झी न्यूजच्या सर्वेनुसार एनडीएला 353 ते 367 जागा मिळण्याची शक्यता. 

रिपब्लिक टीव्ही च्या सर्वेनुसार एनडीएला 353 ते 368 जागा मिळण्याची शक्यता तर इंडिया आघाडीला 118 ते 133 जागा मिळण्याची शक्यता.