यापूर्वी देखील बेकायदेशीर कामावर कारवाया होतच होत्या पण आधी इतका गाजावाजा नव्हता छगन भुजबळ यांचा किरीट सोमय्या यांना टोला

508 28

 

शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री अनिल परब याच्या बंगल्यावर हातोडा मारण्यासाठी काल भाजपचे नेते
किरीट सोमय्या हे दापोलीत आले होते.

कुठल्याही बेकायदेशीर वास्तूंवर, कामांवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा आहेत ना?तरीही न्याय मिळाला नाही तर कोर्ट आहे ना?आधीही बेकायदेशीर कामावर कारवाया होतच होत्या पण आधी इतका गाजावाजा नव्हता.
असे अन्न व पाणी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बोलून किरीट सोमय्या यांना टोला लगावला पुण्यात आले आले असता त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यादेवी पुतळ्याचे उद्घाटन शरद पवारांनी करू नये मी करतो असे म्हटले होते त्यावर छगन भुजबळ म्हणाले,पवार साहेबांवर अशा प्रकारचे आरोप का करावेत हे कळत नाही.फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारानेच जात त्यांनी काम केले आहे, त्यांचे घरचे वातावरण पुरोगामी आहेत.

आतापर्यंत सर्व समाजाला बरोबर घेऊन ते जाताहेत.फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारानेच जात त्यांनी काम केले आहे, त्यांचे घरचे वातावरण पुरोगामी आहेत.राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्यात. असे छगन भुजबळ गोपीचंद पडळकर यांच्या टीकेवर म्हणाले.

मागासवर्गीय आयोगाने ओबीसी आरक्षण आरक्षणाचा अहवाल रखडला आहे . त्यावर छगन भुजबळ म्हणाले,मागासवर्गीय आयोगाने जे रिपोर्ट दिले होते तेच सुप्रीम कोर्टाने फेटाळले.सुप्रीम कोर्टाला अभिप्रेत असलेला अहवाल आहे तो देण्यात आम्हाला यश येईल.दुसरा आयोग नेमलेला आहे तो ओबीसी आरक्षणाचे काम करेल.आधीचा आयोग बरखास्त करायचे की नाही हे राज्य सरकार ठरवेल. असे छगन भुजबळ म्हणाले.
ईडी सारख्या महाविकास आघाडी मधल्या मंत्र्यांवर कारवाई करत आहे. त्यावर भुजबळ म्हणाले,या यंत्रणांचा वापर राजकीय हेतूने आणि राजकीय लोकांना संपवण्यासाठी करु नये असं वाटतं.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide