माजी मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना पर्यावरण विभागाची नोटीस; किरीट सोमय्या म्हणाले….

919 0

माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने मढ मार्वे स्टुडिओ प्रकरणी नोटीस पाठवली आहे.

या प्रकरणी मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण विभागानं दिले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, “असलम शेख – मढ मार्वे ₹1000 कोटींचा स्टुडिओ घोटाळा. महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने नोटीस जारी केली आहे. मुंबई जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्यास सांगितलं. मला स्टुडिओ तोडण्याची कारवाईची अपेक्षा आहे.”