Crime

गुन्हेगार आणि जवानांच्यात चकमक; दोन जवानांचा मृत्यु

516 0

झारखंड देवघर येथे एका चकमकीत मासळी व्यावसायिकाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. या हल्यामागचे कारण खंडणी व वर्चस्वासाठीची लढाई असल्याचे सांगितले जात आहे.

देवघर येथील मासे व्यावसायिक सुधाकर झा यांच्यावर काल रात्री गुन्हेगारांनी हल्ला केला. शस्त्रधारी गुन्हेगारांनी त्यांना लक्ष्य करत गोळीबार केला. या हल्ल्याला सुधाकर झा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सरकारी अंगरक्षकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांच्या सुरक्षेत गुंतलेल्या या दोन जिल्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारांना गोळ्या घातल्या. मात्र या चकमकीत हे दोन्ही पोलीस शहीद झाले.

Share This News
error: Content is protected !!