लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांचा राजीनामा

4230 0

नवी दिल्ली: सध्या कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असतानाच  निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरुण गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. निवडणूक आयोगात यापूर्वीच निवडणूक आयुक्त पद रिक्त होते. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयोगात आयुक्तांची दोन पदे रिक्त आहेत. अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर आता फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांव्यतिरिक्त निवडणूक आयोगात आणखी दोन निवडणूक आयुक्त असतात.

गोयल यांच्यानंतर आता निवडणूक व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी राजीव कुमार यांच्यावर असणार आहे. निवडणूक आयोगात दोन मुख्य आयुक्तांसह अन्य दोन आयुक्तही असतात. त्यापैकी एक जागा आधीच रिक्त होती. त्यात आता गोयल यांच्या राजीनाम्याची भर पडली आहे. केंद्रीय कायदे आणि न्याय मंत्रालयाने यासंबंधी एक अधिसूचना जारी केली असून राष्ट्रपतींनी गोयल यांचा राजीनामा स्वीकारला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!