Uddhav Thackeray

Maharashtra Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का ! ‘हा’ निष्ठावंत शिलेदार सोडणार साथ

1257 0

नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुका (Maharashtra Politics) पार पडणार आहेत. मात्र त्या अगोदरच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषद निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. किशोर दराडे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येणार आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान किशोर दराडे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये दराडेंच्या जागेवर नवा पर्याय शोधला आहे. नाशिक शिक्षक मतदार संघ ही जागा महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाच्या वाट्याला आल्यानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव गुळवे यांचे पुत्र संदीप गुळवे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. या मतदारसंघातून संदीप गुळवे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाणार आहे.

दरम्यान चार जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चत करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर ज मो अभ्यंकर यांना मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे, संदिप गोपाळ गुळवे यांना नाशिकमधून तर काँग्रेसचे नेते रमेश कीर यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

PUNE ACCIDENT BREAKING NEWS: ब्रह्मा रियालिटी चे संचालक विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वरमधील अनधिकृत रिसॉर्ट सील

PUNE PORSCHE CAR ACCIDENT: अल्पवयीन कारचालक आरोपी वेदांत विशाल अग्रवालची आई शिवानी अग्रवालला अखेर अटक

Share This News
error: Content is protected !!