Eknath Shinde Pilot मुक्ताईनगरातील संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
नियोजित दौऱ्यातील कार्यक्रम आटोपून रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परतीच्या प्रवासासाठी मुंबईकडे निघाले होते. Eknath Shinde Pilot
EKNATH SHINDE DCM OATH: एकनाथ शिंदे यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
पण वैमानिकाने विमान उडविण्यास ऐनवेळी नकार दिल्याने मोठा गोंधळ उडाला.
मुक्ताईनगरातील नियोजित कार्यक्रम आटोपून रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर पोहोचले.
त्यांच्याबरोबर पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित होते.
EKNATH SHINDE VS SANJAY RAUT | नाशकातील विवाह सोहळ्याला संजय राऊत एकनाथ शिंदे समोरासमोर
ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे विमानात बसून काही तासातच मुंबईत पोहोचणार होते.
परंतु, तेवढ्यात शिंदे यांना मुंबईहून घेऊन आलेल्या वैमानिकाने प्रकृतीचे कारण देत विमानाचे उड्डाण करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.
तब्बल 12 तास उड्डाण केल्यामुळे शारीरिक थकवा जाणवत असल्याचे वैमानिकाने सांगितल्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांना प्रतिक्षा कक्षात हतबल होऊन बसावे लागले.
मंत्री महाजन आणि पालकमंत्री पाटील यांनी वैमानिकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
विमान प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडूनही वैमानिकांची मनधरणी करण्यात आली.
वैमानिकाच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही बोलविण्यात आले.
मंत्री गिरीष महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी स्वतः विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला.
तेव्हा कुठे वैमानिक विमान घेऊन मुंबईच्या दिशेने रात्री उशिरा रवाना होण्यास तयार झाला.
या गोंधळात तब्बल 45 मिनिटे एकनाथ शिंदे यांना प्रतिक्षा कक्षात नाईलाजाने बसावे लागले.
त्यामुळे त्यांचे पुढील नियोजित कार्यक्रम देखील त्यामुळे रखडले.