एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा पदभार

346 0

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात पदभार स्वीकारला. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात त्यांनी प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पदभार स्वीकारण्याआधी समर्थक आमदारांकडून पुष्पगुच्छ देऊन मंत्रालयात स्वागत करण्यात येत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी पदभार स्वीकारण्याआधी समर्थक आमदारांकडून पुष्पगुच्छ देऊन मंत्रालयात स्वागत करण्यात येत होते. पूजा केल्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल झाल्यानंतर मोठा उत्साह दिसून आला. त्यांचे स्वागत करण्यासाठी समर्थक आमदार, पदाधिकारी, अधिकारी यांची गर्दी झाली होती.

शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. तसेच त्यांनी लगेचच विविध विषयांवरील बैठकांना उपस्थिती देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश उपस्थित होते. यावेळी काही आमदारांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्र्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती.

Share This News
error: Content is protected !!