राजकारण

विधान परिषद निवडणूक: काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांचा विजय

विधानपरिषद निवडणुकीचा निकाल आता समोर येत असून यामध्ये महायुतीच्या नऊ उमेदवारांचा विजय झाला असून काँग्रेसच्या डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव यादेखील विजयी झाले आहेत.

काँग्रेसच्या प्रज्ञा राजीव सातव यांची दुसऱ्यांदा विधान परिषदेच्या आमदार पदी वर्णी लागली आहे.

राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभेच्या रिक्त जागी रजनी पाटील यांची वर्णी लागल्यानंतर राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची संधी मिळाली होती