AKKALKUVA ASSEMBLY: मुलगा खासदार, वडील गड राखणार का? काय आहे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती

178 0

राज्यात अवघ्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाचणार आहे सर्वच पक्ष मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी करत असताना पाहायला मिळत आहे महाराष्ट्र मध्ये विधानसभेचे एकूण 288 विधानसभा मतदारसंघ असून या 288 मतदारसंघांमध्ये सद्यस्थिती काय आहे कोणत्या पक्षांचे आमदार आहेत मागील निवडणुकांमध्ये या मतदार संघातील गणित नेमकी कशी राहिली होती यावरचा आढावा घेणारा टॉप न्यूज मराठीचा विशेष कार्यक्रम चर्चा विधानसभेची आढावा मतदार संघाचा.

चर्चा विधानसभेचे आढावा मतदार संघाचा या विशेष कार्यक्रमांमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातील पहिला मतदारसंघ अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाबद्दल या मतदारसंघात काँग्रेसचे ॲड. के.सी पाडवी हे विद्यमान आमदार आहेत 2008 च्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला असून अक्कलकुवा मतदारसंघ अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ आहे.

2009 2014 आणि 2019 या तीन निवडणुकांमध्ये अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील स्थिती काय होती के.सी पाडवी यांच्या विरोधात कोणी निवडणूक लढवली होती पाहूयात

2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे के.सी पाडवी, अपक्ष उमेदवार विजयसिंह पराडके, नरेंद्र सिंह पाडवी विरुद्ध शिवसेनेकडून मंगलसिंग वाळवी निवडणुकीच्या रिंगणात होते

या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या के. सी. पाडवी यांना 52,273 इतकी मतं मिळाली होती

अपक्ष उमेदवार विजयसिंह पराडके यांना 49, 714 तर नरेंद्र सिंह पाडवी यांना 25,238 इतकी मतं मिळाली होती.

शिवसेनेच्या मंगलसिंह वाळवी यांना अवघी 6,184 इतकी मतं मिळाली होती
————————————————-

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती व आघाडी तुटल्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसकडून के.सी. पाडवी राष्ट्रवादीकडून विजयसिंह पराडके, भाजपाकडून नागेश पाडवी तर शिवसेनेकडून आमशा पाडवी निवडणुकीच्या रिंगणात होते.

2014 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या के सी पाडवी यांना 64, 410 इतकी मतं मिळाली होती

राष्ट्रवादीच्या विजयसिंह पराडके यांना 48,635 इतकी मतं मिळाली होती

भाजपाच्या नागेश पाडवी यांना 32,701 इतकी मतं मिळाली होती

शिवसेनेच्या आमशा पाडवी यांना 10,349 इतकी मतं मिळाली होती
————————————————-

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून के.सी. पाडवी शिवसेनेकडून आमशा पाडवी अपक्ष नागेश पाडवी अशी तिरंगी लढत झाली होती.

या निवडणुकीत काँग्रेसच्या के.सी. पाडवी यांना 82,770 इतकी मतं मिळाली होती

शिवसेनेच्या आमशा पाडवी यांना 80,674 इतकी मतं मिळाली होती

अपक्ष नागेश पाडवी यांना 21,664 इतकी मतं मिळाली होती

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!