MAHARASHTRA BJP: मुख्यमंत्रिपदासाठी नाव चर्चेत आलेल्या ‘या’ नेत्याला भाजपा देणार मोठी जबाबदारी

424 0

देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार (CABINET FORMATION) होत असून त्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाचे 19 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन राज्यमंत्रीपदासह आठ मंत्री शपथ घेत आहेत.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (CHANDRASHEKHAAR BAVANKULE) देखील आज मंत्रीपदाची शपथ घेत असून भाजपाचे पुढचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण (RAVINDRA CHAVHAN) यांनी निवड करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

काही दिवसांपूर्वी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू होती मात्र आता त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात

कोण आहेत रवींद्र चव्हाण?

रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून 2009 पासून ते डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधित्व करतात. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये रवींद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम पाहिला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अशी रवींद्र चव्हाण यांची ओळख आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात शपथ घेणारे 35 आमदार कोण?

भाजपाकडून मंत्रीपदी कोणाची वर्णी?

  1. चंद्रशेखर बावनकुळे
  2. गिरीश महाजन
  3. चंद्रकांत पाटील
  4. राधाकृष्ण विखे पाटील
  5. पंकजा मुंडे
  6. माधुरी मिसाळ
  7. मेघना बोर्डीकर साकोरे
  8. मंगल प्रभात लोढा
  9. आशिष शेलार
  10. नितेश राणे
  11. शिवेंद्रसिंहराजे भोसले
  12. पंकज भोयर
  13. गणेश नाईक
  14. अतुल सावे
  15. संजय सावकारे
  16. आकाश फुंडकर
  17. अशोक उईके
  18. जयकुमार गोरे
  19. जयकुमार रावल

शिवसेनेकडून मंत्रीपदी कोणाची वर्णी?

  1. संजय शिरसाट
  2. गुलाबराव पाटील
  3. दादा भुसे
  4. उदय सामंत
  5. शंभूराज देसाई
  6. योगेश कदम
  7. प्रकाश आबीटकर
  8. प्रताप सरनाईक
  9. आशिष जयस्वाल

राष्ट्रवादीकडून मंत्रीपदी कुणाची वर्णी?

  1. आदिती तटकरे
  2. नरहरी झिरवाळ
  3. हसन मुश्रीफ
  4. अनिल पाटील
  5. बाळासाहेब पाटील
  6. दत्तात्रय भरणे
  7. सना नवाब मलिक – राज्यमंत्री
  8. इंद्रनील नाईक – राज्यमंत्री

https://topnewshindi.in/chance-of-becoming-mla-minister-from-pune-district/

CABINET FORMATION: ठरलं! 35 जण घेणार मंत्रीपदाची शपथ; वाचा संपूर्ण यादी

MINISTERS LIST : बातमी फुटली! महायुतीच्या मंत्र्यांची संभाव्य यादी समोर ?

LADKI BAHIN YOJANA: लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार ? माजी मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती

Share This News
error: Content is protected !!