ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारण

ठाण्यात पुन्हा ‘दिघे राज’; केदार दिघे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

मुंबई: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर अनेक खासदार,आमदार,माजी आमदार, पदाधिकारी यांनी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसेनेनं मोठा निर्णय घेतला आहे. 

धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांची ठाण्याच्या जिल्हाप्रमुखपदी करण्यात आली असून अनिता बिर्जे यांची शिवसेनेच्या उपनेते म्हणून निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी या नियुक्तीची घोषणा करण्यात आली असून केदार दिघे यांच्या नियुक्तीनं ठाण्यात दिघे विरुद्ध शिंदे संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.