धर्मवीर स्व. आनंद दिघे यांच्या जीवनावर दोन वर्षांपूर्वी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यानंतर आता तब्बल दोन वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट प्रदर्शित झाला असून या चित्रपटावरून राज्याचं राजकारण सध्या चांगलंच तापल्याच पाहायला मिळत आहे.
अशातच आताच शिंदे गटाच्या एका बड्या नेत्याने केलेल्या विधानाने एकच खळबळ राजकीय वर्तुळात उडाली आहे.
धर्मवीर आनंद दिघे यांची हत्या झाली असून हे संपूर्ण ठाण्याला माहिती आहे या प्रकरणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी शिंदे गटाचे आमदार व सिडकोचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शिरसाठ यांनी केली आहे संजय शिरसाठ यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.