Breaking News

मुंडे भाऊ, बहीण भगवानभक्तीगडावर एकत्र येणार; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे राहणार उपस्थित

165 0

बीडच्या सावरगाव घाट येथे ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये गत दहा वर्षापासून दसरा मेळावा होतो. या मेळाव्याला आतापर्यंत धनंजय मुंडे हे कधीही उपस्थित राहिले नव्हते. परंतु आता प्रथमच धनंजय मुंडे या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्वतः धनंजय मुंडे यांनी एक्स पोस्टद्वारे अशी माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळाली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार याची उत्सुकता असणार आहे.

https://x.com/dhananjay_munde/status/1844234358233907507?s=19

पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातून बीड जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरत असते. मात्र आता या मेळाव्याला महायुतीचेच नेते असलेले धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे काय बोलणार? याकडे बीडमधील जनतेचे लक्ष लागले आहे.

 

Share This News
error: Content is protected !!