शिवसेना-मनसे एकत्र येणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या भेटीला

597 0

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवतीर्थ या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची भेट मानली जाते.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे, उदय सामंत हे देखील राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले तर मनसे कडून संदीप देशपांडे, अमेय खोपकर, अविनाश जाधव उपस्थित होते.

या भेटीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना युती करेल अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. काही दिवसांपूर्वी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट

Share This News
error: Content is protected !!