devendra-fadnavis

केंद्रीय अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

676 0

आज देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय. यावर उपमु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. ‘अमृतकालातील सर्वजनहिताय अर्थसंकल्प’, या संकल्पनेवर आधारित यंदाचा अर्थसंकल्प आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

माध्‍यमांशी बोलताना फडणवीस म्‍हणाले, विकसित भारताकडे जाणारा मार्ग यंदाच्‍या अर्थसंकल्पात आहे. या अर्थसंकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. यामधून राज्यांना पायाभूत गुंतवणूक करण्यास मदत मिळेल. तसेच पायाभूत सुविधाही मोठ्या प्रमाणात वाढतील, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Share This News
error: Content is protected !!