पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते सतेज पाटील आणि मराठवाड्यातील बडे नेते अमित देशमुख यांच्यासारख्या नेत्यांना बाजूला सारून काँग्रेसने स्वच्छ प्रतिमा अशी ओळख असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसच नेतृत्व दिलं आहे. भाजप सहकार चळवळीतील नेतृत्वावर ईडी, सीबीआय किंवा आयटीचा दबाव टाकून त्यांना अडचणीत आणू शकते त्यामुळे त्याचा पक्षाला फटका बसतो. ही शक्यता गृहीत धरून काँग्रेसने पहिल्यांदाच स्वच्छ प्रतिमेचा चेहरा हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष केलं आहे. पण आता सपकाळ यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणत्या आव्हानांना सामोर जावं लागणार आहे. नाना पटोले यांच्यानंतर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. कोल्हापूरचे सतेज पाटील, सांगलीचे विश्वजित कदम, लातूरचे अमित देशमुख आणि इतरही नेत्यांची नाव या पदासाठी चर्चेत होती, पण काँग्रेसने धक्का तंत्राचा वापर करत सरप्राईजिंग चेहरा समोर आणला.
राज्याच्या राजकारणात चर्चेत नसलेल्या आणि कधीही कुणीही विचार न केलेल्या हर्षवर्धन सपकाळ या काँग्रेस नेत्याची थेट राज्यातील पक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसची राज्यातील स्थिती पाहता हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमोर अनेक आव्हान आहेत. अगदी सुरुवातच करायची झाली तर सगळ्यांना प्रदेशाध्यक्ष केल्यामुळे काँग्रेस मधील अनेक बडे आणि ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत.
जे प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते ते नेते देखील नाराज आहेत.अशा स्थितीत हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळायची आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाला लागलेली गळती रोखण्यापासून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच मोठ आव्हान सपकाळ यांच्यासमोर असेल. राज्य काँग्रेसमध्ये नवख्या किंवा अनोळखी चेहऱ्याकडे प्रथमच अध्यक्षपद सोपवण्यात आलय. आतापर्यंत सर्व जुन्या जाणत्या नेत्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. महाराष्ट्रात बुलढाण्याचे माजी आमदार एवढीच ओळख असलेल्या सपकाळ यांना राज्यभर नेतृत्व प्रस्थापित करावे लागेल. राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी असलेल्या सपकाळ यांना गटबाजीने पोखरलेल्या राज्य काँग्रेसमध्ये समन्वयाची भूमिका बजवावी लागेल. निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोड़ून जात आहेत. गेल्याच आठवड्यात नवी मुंबईतील काँग्रेसला खिडांर पडल. अनेक नेते भाजप किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अशा वेळी गळती रोखण्याच मोठ आव्हान सपकाळ यांच्यासमोर असेल. राज्यभर दौरे करून पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाच वातावरण तयार कराव लागेल. सर्वांना बरोबर घेऊन जाव लागेल.